थोर नेत्या विषयी

  १. खरा देव शोधा.....

 

खालील प्रश्नांची उत्तरे शोधा म्हणजे गणपती कुठे आहे समजेल.. !
१. लालबाग चा राजा हा गणपतीच ना? जर
तो नवसाला पावतो अशी लोकांची श्रद्धा आहे मग देव्हाऱ्यात

असलेला गणपती हा वेगळा आहे का ? मनोभावे पूजन केल्यावर
तो देखील नवसाला पावणार नाही का? मग त्यासाठी लालबाग
ला जावेच लागते असे आहे का ?
२. शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितले आहे की मूर्ती शाडू मातीपासून
तयार करावी मग प्लास्टर पासून तयार केलेली मूर्ती खरंच
शास्त्रोक्त आहे का?
३. गणपती च्या एवढ्या अवाढव्य मुर्त्या तयार केल्या जातात
की विधी करण्यासाठी चक्क त्या मूर्ती वर चढावे लागते ,
घरी पूजा करताना देवाच्या पाटाला कधी पाय लागू न देणारे आपले
संस्कार , खरच या मोठ्या मूर्तींचे पावित्र्य राखले जाते का?
४. दरवर्षी या मोठ्या मुर्त्या पडल्याची एक तरी दुर्घटना होते ,
यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या जातात मग यातून काही बोध
घेण्याऐवजी पुन्हा तीच कृती करणे कितपत योग्य आहे?
५. या मोठ्या मुर्त्या विसर्जनाकरिता समुद्रावर नेऊन
मूर्त्यांच्या गळ्यात दोरी टाकून समुद्रात पाडल्या जातात , हे
आपले विधिवत विसर्जन ? ही आपली संस्कृती ? ही आपली धार्मिक
श्रद्धा ?
६. लालबाग ला २४-२४ तास रांगेत उभे राहून जीवाचे हाल करून
एका दिवसात पुण्य प्राप्ती होते का? त्याऐवजी रोज केवळ १०
मिनिटे आई वडिलांची सेवा केल्यास कमी त्रासामध्ये जास्त पुण्य
मिळणार नाही का?
मंदिर असो वा मस्जिद देव हा सर्व ठिकाणी सारखाच आहे ,
आकारांची पूजा करण्याऐवजी विचारांची पूजा करा , देवाला केवळ
नवस केल्याने इच्छा पूर्ण होत नाही , त्याला जोड लागते
मेहनतीची , सत्याची आणि चांगल्या कर्मांची ...!!!

२. महात्मा गांधी जयंती विशेष .......

***************************
 �� महात्मा गांधी जयंती विशेष ��
**************************
           
**************************
     मोहनदास करमचंद गांधी जन्म - २ ऑक्टोबर  १८६९  मृत्यू - ३० जानेवारी  १९४८    
        हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.
     अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. महात्मा या संस्कृत भाषेतील शब्दाचा अर्थ आहे 'महान आत्मा'. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते.      

        नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले. ते सत्याग्रहाचे जनक होते. त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते.
***************************
  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना कोटी-कोटी प्रणाम !
��������������

बनसुडे धनराज शिवाजी ....