तुळजाभवानी देवीचा इतिहास......

तुळजाभवानी देवीचा इतिहास......

तुळजाभवानी देवीचा इतिहास......
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

|| श्री तुळजाभवाशनी प्रसन्न ||
������������������
|| सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ
साधिके ।शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तुते



उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तीर्थ
समुद्रसपाटीपासून २६०० फुट इंच असून येथील भवानी
मातेचे मंदीर बालाघाट डोंगरच्या कडेपठारावर वसले
आहे. या डोंगराचे पूराण ग्रंथातील जुने नाव
यमुनागिरी असे होते. कालांतराने या स्थानी
चिंचेची झाडे असल्यामुळे त्याचे नामकरण चिंचपूर
झाले. नंतर तुळजाभवानीच्या नावाने लोक
तुळजापूर म्हणू लागले.संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून
या देवीला मान आहे. कृतयुगात -अनुभूतीसाठी,
त्रेत्रायुगात -श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात -
धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती
शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी
भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशांतून
विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात.एवढेच नव्हे
तर मातेचे भक्त हिन्दुस्तनतच नव्हे तर परदेशातही
आहेत. हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून
उस्मानाबाद व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके
आहेत.
उस्मानाबाद - तुळजापूर अंतर १९ कि.मी.
आहे.व सोलापूर येथून ४५कि.मी. आहे. सोलापूर,
उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव,मुंबई, पुणे,
कोल्हापूर या ठिकाणांहून तुळजापूरला थेट बसची
सोय आहे.
कृतयुगात कर्दभ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले.
त्यांची पत्नी अनूभुती रुपसंपन्न असून पतिव्रता
होती. सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले.परंतु
त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही.
कारण कर्दभ ऋषींनी लवकरच इह्लोकीची यात्रा
संपविल्यामुळे अनुभुतिने सति जाण्याचा निर्णय
घेतला; परंतु अल्पवयीन पुत्राला मागे सोडून
पतिसोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्राचा
आधार घेऊन सांगितले असता अनुभूतीने आपल्या
पुत्राला गुरुगृही सोडुन ती मेरू पर्वतानजिक
असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली.
आणी तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली.
तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य
तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लूब्ध झाला.त्याच्या
मनात पापवासना निर्माण होऊन त्याने तिला
स्पर्श केला त्यामुळे तिची समाधी भंग पावली.
दैत्याने काही अनुचित प्रकार करु नये म्हणून तिने
आदिशक्तिचा धावा केला. यासाठी की शक्तीने
या दैत्याच्या तावडीतून आपली सुट्का करावी
आणी खरोखरच देवी भवानी मातेच्या रुपाने त्वरित
धावून आली. तिने दैत्याशी युदध केले. दैत्यही
महिषाचे रूप घेऊन आला. तेव्हा देविने त्रिशुळाने
त्याचे शीर वेगळे केले.ही भवानी देवी वेळीच
अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे
तिला त्वरिता असे नाव पडले. कालांतराने
त्वरिताचे-तुरजा व त्याचे पुढे तुळजा
झाले.निजामशाही असो किंवा आदीलशाही असो
कोणीही धार्मिक बाब्तीत हस्तक्षेप करीत
नसत.1920 पर्यंत या गावात एकही धर्मशाळा
नव्हती.या साली गावची लोकसंख्या सूमारे 5000
एव्हडी होती.
भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी
काही पाय-या उतरल्यानंतर महाद्वार
लागते.त्यावरील काही शिल्प हेमाड्पंथी असून तिथे
नारद मुनींचे दर्शन घडते. पुढे गेल्यावर कल्लोळ तीर्थ
लागते. देवी इथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची
निर्मिती केली. तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थे
या तिर्थास धावून आल्यामुळे त्यांचा एकच
कल्लोळ झाला. यास्तव या तीर्थास ’कल्लोळ
तीर्थ’ म्हणतात.
स्नान कल्लोळ तीर्थाठायी।दर्शन घेई देवीचे॥ घेता
चरण तीर्थोदय।होय जन्माचे सार्थक॥
या तीर्थापसून समोरच गोमुख तीर्थ लागते.
त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह
वाहतो.त्याचप्रमाणे श्रीदत्ताचे हस्तप्रक्षालनाचे
ठिकाण आहे.पूढे गेल्यावर अमृतकुंड लागते. त्याच्या
अलीकडे गणेश मंदिर आहे.येथे सिद्धीविनायक
आहे.नंतर निंबाळकर दरवाजा लागतो. दरवाजा
ओलांडून आत गेले असता मातेचा कळस नजरेस
पडतो.हा कळस पंचधातूपासून बनविला
आहे.मंदिराच्या दर्शनी बाजुस होमकुंड आसून त्यावर
शिखर बांधले आहे. मंदीराचा सभामंडप सोळाखांबी
असून पश्चिम दिशेला मातेचा गाभारा
आहे.इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट
अथवा यादवकालीन मानले जाते.
गाभा-याचे मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूध
झालेली भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेची
असून तिने विविध शस्त्रे धारण केलेली आहेत. देविने
एका हातात महिषासुराची शेंडी धरली आहेत. तर
दूस-या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशुल खुपसला
आहे. तिच्या उजव्या पायाखाली महिषासूर व
डाव्या बाजुला सिंह आणि पूराण सांगणारी
मांर्केडेय ऋषीची मुर्ती दिसते. देविच्या उजव्या
खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सुर्य
कोरलेला दिसतो.देविला स्पर्श कोणालाही करता
येत नाही.देवीला पूर्वी 3 वेळा पूजा केली जात.
आता मात्र सकाळ-संध्याकाळ अशी 2 वेळा पूजा
केली जाते. गाभा-याच्या उत्तरेस शयनगृह असून
त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवला आहे
=========================
महाराष्ट्राचे आराध्यदैवत आई तुळजा भवानीचा इतिहास माहिती असावा म्हणुन ही खास पोष्ट....  
 
 
 
 
बनसुडे डि.एस. www.bansude22.blogspot.in