कविता

बदल्या ...

यंदा तरी होईल बदली...मनापासून वाटतंय...
प्रशासनाची होईल मर्जी ...मनापासून वाटतंय...
'का रे दुरावा'...असा प्रश्न पडत राहतो...
'पगार आहे डबल'..म्हणून समाज   आम्हाकडे पाहतो
पैसा जवळ ...हक्काचा माणुस दूर म्हणून डोळ्यात पाणी साठतय...
यंदा तरी होईल बदली... मनापासून वाटतंय...
नोकरीत स्थिर व्हाव ...म्हणून तिन वर्षे गेली..
संसारापुरत कमवाव ..म्हणून आणखी तिन गेली...
लग्न करुण फसलो राव...सन्यास्याचच जीवन सोप वाटतंय...
यंदा तरी होईल बदली...मनापासून वाटतंय...
बरे असते बालपनच...सर्वांगीण विकासाचा विचार होतो..
कुणीच् विचार करत नाही...जेव्हा या बालकातला मानुस मोठा होतो...
याच जगातले का आम्ही..म्हणून शंकांच् मनी ढग दाटतय...
यंदा तरी होईल बदली अस मनापासून वाटतंय...
'पति पत्नी एकत्रीकरण'...गोंडस किती नाव आहे...
वर्षानुवर्षे बदल्या राखडल्या...हा तर विभाजनाचा डाव आहे..
किती ठिगळ जोड़नार मनाला....इथ भावनांच् आकाशच फाटतय...
पण गुरुजनहो.....
यंदा तरी होईल बदली अस मनापासून वाटतंय...मनापासून वाटतंय...
बनसुडे धनराज 

या ओळी तुम्हांला नक्की आवडतील

सुरेश भटांच्या चार सुंदर ओळी..

आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे !
रडतोस काय वेड्या.? लढण्यात शान आहे.!
काट्यातही फुलांची झुलती कमान आहे !
उचलून घे हवे ते , दुनिया दुकान आहे !
जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे.

"सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं,कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुनपडावं लागतं"...

Bansude D.S.

मला माझी जि.प.प्रा. शाळा आठवते .....

एक आठवण-माझी शाळा 




विसरलो नाही मी
तळव्यावरची जांभळी खूण
फोकाचा तो जाड व्यास
गणित म्हणजे काय अजून?

इतिहासाच्या सनावळी
एकाखाली एक शंभर ओळी
खाडाखोड केलीत तर
जाळ काढेन कानाखाली

शुद्धलेखन अलंकार
निबंधाचा साँल्लिड त्रास
वहीवरती लाल भोपळे
ओणवे रहा एक तास

आम्ल आणि अल्कली
सारी अक्कल बुडाली
शिवाय होती ठरलेली
शिव्यांची लाखोली

पाढे जर चुकलात तर
पायाखाली तुडवीन
कोंबडीचे पाय काढलेत तर
वहाणेने बडवीन

शीत वारे उष्ण वारे
इकडून तिकडे वाहून गेले
आमचे सारे बालपण
त्यांच्या संगे उडून गेले

गुरुजींच्या भितीमुळे
आपसूक शिकत गेलो
फटके खाल्ले थोडेफार
कणखर मात्र बनत गेलो

आयुष्यातले स्थैर्य
पाच आकडी पगार
कुणामुळे मिळाला
हा सुखी संसार?

ब्रॅडेड शूज घेताना
तुटकी वहाण आठवते
कुणास ठाऊक कशासाठी
पापणी थोड़ी ओलावते!